X ARMY हे एक इचलकरंजी मधील नावाला आलेला गणेश उत्सव मंडळ जिथे दर वर्षी विविध रूपातील गणपती बसवले जातात. गणपती हा सार्वजनिक उत्सव / सन आहे ज्यात उत्साह, उमेद, आणि प्रेरणा यांनी भरलेला सण आहे . 10 दिवस ह्या गणपतीची पूजा मनो-भावाने केली जाते. या दिवसा दरम्यान X ARMY मंडळा मध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम राबवते, कार्यक्रमाची आखणी इथल्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. आखणी करताना सर्व वयातील व्यक्तींचा विचार केला जातो.
हे होणारे कार्यक्रम फक्त युवा वर्गासाठी नसून वृद्ध व लहान मुलांसाठी सुद्धा असतात; तसेच काही कार्यक्रम फक्त महिलांसाठी असतात
लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, 1 मी शो , व इतर अनेक खेळ घेतले जातात .
वृद्धांसाठी स्मार्ट आजी हा कार्यक्रम नुकताच 2016 मध्ये पार पडला. 2016 मध्ये खास गोष्ट होती ती म्हणजे महिलांसाठी सर्वात जास्त कार्यक्रम घेण्यात आले. आम्ही दोघी , पाककला, रांगोळी स्पर्धा, स्मार्ट आजी, डोक्यावर घागर घेऊन जाणे, कीर्तन, शलोक वाचन इत्यादी पार पडले .
ठरल्या प्रमाणे मंडळाला दर वर्षी आवाडे येतातच तसेच इतर मंडळी हि दर्शन व गणपती पूजेसाठी येतात.
इचलकरंजी मधील गणपती देखावा बघण्यासारखा असतो व त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध संस्था , संघटना देखाव्यांना क्रमांक देऊन गौरव करत असते.ह्या मध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, मारवाडी युवा मंच, रोटरी व लिओ ऑफ इचलकरंजी,मोरया पुरस्कार,बिल्डर्स अससोसिएश व मारुती फौंडेशन ह्यांच्या कडून मिळाली आहेत. X ARMY ला मिळालेली पारितोषिके वेबसाईट च्या ‘पारितोषिक’ ह्या पेज वर सजवली आहेत. मंडळाच्या ह्या वेबसाईट वर 2016 मध्ये झालेले सर्व कार्यक्रम, खेळ सर्व काही व्यवस्थित रित्या फोटो गॅलरी नुसार मांडले आहे. विडिओ विभागात मंडळाचे काही विडिओ आहेत खुप छान इफेक्ट्स देऊन बनवले व्हिडिओस तुम्हांला नक्की आवडतील असे..
अशा प्रकारे हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपून कार्यरत आहे आणि आपली ओळख अधिकच मजबूत बनवत आहे.
x army 2016 - xarmy.in

 

 

YouTube Channel of X ARMY Facebook Page of X ARMY